महाड: पनवेल महानगरपालिकेचा “माझी वसुंधरा अभियान ६.०” उपक्रम पर्यावरण दूतांची निवड — शाळांमध्ये जनजागृतीचा हरित संकल्प!
Mahad, Raigad | Nov 11, 2025 पनवेल महानगरपालिकेच्या वतीने “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत विकासासाठी त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दूतांची निवड करण्यासाठी महापालिकेच्या विविध शाळांमध्ये विशेष जनजागृती उपक्रम घेण्यात आला.