राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार देवराव भोंगळे यांचे मार्गदर्शनात आज दि.२ नोव्हेंबरला १२ वाजता पंचायत समिती, नगर परिषद व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक संदर्भातील आढावा बैठक राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात पार पडली.यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.