16 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चार चे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी नंदनवन हद्दीतील गुरुदेव नगर येथे हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव नदीम अल्तमश असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक लोखंडी चाकू किंमत दोनशे रुपये जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याला पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले आहे.