जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात शेजारील मुलाकडे गेलेल्या महिलेच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटातील १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.