धामणगाव रेल्वे: कॉटन मार्केट चौक तहसील कार्यालय येथे भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना अडसड अक्का रोठे यांचे नामांकन अर्ज दाखल
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई (आक्का) अडसड रोठे यांनी जल्लोषात आपले नामांकन दाखल केले. शहरभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. घोषणाबाजी, आणि भगवे झेंडे यांच्या गजरात उमेदवारांनी तालुकाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करताच परिसर दणाणून गेला.या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक उपस्थित होते. नामांकनानंतर बोलताना डॉ. अर्चनाताई अडसड रोठे म्हणाल्या विकास होणार