राजूरा: राजुरा येथील संविधान चौकात महाविकास आघाडीचे थाली बजाव आंदोलन
राजुरा तालुक्यातील वाढत्या समस्या आणि शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौक येथे आज दि 20 सप्टेंबर ला 12 वाजता थाली बजाव आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीनही पक्षांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.