नागपूर ग्रामीण: हुडकेश्वरमधून बेपत्ता झालेली १७ वर्षीय अल्पवयीन सुरक्षित रेस्क्यू
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ जून रोजी बेपत्ता झालेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी अखेर सुखरूप सापडली आहे. तिला एका संशयित मुलासोबत गोरेवाडा भागात शोधण्यात पोलिसांना यश आले.मुलगी घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती, त्यानंतर अज्ञात आरोपीने तिला पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती.