बल्लारपूर: विसापूर-नांदगांव (भिवकुंड) भुमिगत खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना न्याय मिळवून देणार - हंसराज अहीर
विसापूर-नांदगाव (भिवकुंड) भुमिगत खाण प्रकल्पासाठी बल्लारपूर, विसापूर, नांदगांव (पोडे) येथील 802 हे. आर शेतजमिन अधिग्रहीत होण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाबाबत वर्ष 2024 मध्ये पर्यावरण विषयक जनसुनावणी पार पडली. जवळपास 65 वर्षांचे कालावधी आणि 1.08 मिलीयन टन प्रतिवर्ष कोळसा उत्पादन क्षमता असलेल्या या भुमिगत खाणीच्या अधिग्रहणाबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम असून, प्रकल्पाचे भुमिगत स्वरूप, त्यामुळे प्रस्तावित संपूर्ण जमिनीतील प्रकल्पग्रस्तांना अधिग्रहणाचा लाभ मिळणार नसल्याब