भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिका निवडणुकीचा निकाल दि. २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी कौल दिल्याने नगराध्यक्ष पदी अपक्ष उमेदवार सुनील रमेश काळे विजयी झाले आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट)च्या उमेदवारांना नागरिकांनी स्पष्टपणे नाकारले आहे.