राजूरा: सास्ती येथे गावातील घरावर वीज कोसळली ; घराचे नुकसान मात्र जीवीतहानी नाही
काल दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री ११-३० वाजता च्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असतांना सास्ती गावातील रहिवासी सुरेश विश्वनाथ काळे यांच्या राहत्या घरी वीज दुमजली घरावर वीज पडली. यामुळे घर आणि घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात जिवहानी झाली नाही.घरातील विजेची संबधित वस्तू इन्वर्टर, टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन, तिन सिलिंग पंखे व घरातील पूर्ण केबल जळून गेले. यात अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. सास्ती उपसरपंच सचिन कुडे यांनी आज दि १४ सप्टेंबर ला ९ वाजता भेट देऊन पाहणी केली.