कोरेगाव: द डेक्कन क्लिफहॅंजर २०२५: पुणे ते गोवा सायकलिंग स्पर्धेत पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे सहभागी, कोरेगाव तालुक्यात स्वागत
पुणे ते गोवा या मार्गावर होणारी प्रतिष्ठित द डेक्कन क्लिफहॅंजर २०२५ ही सायकलिंग स्पर्धा १ नोव्हेंबर रोजी पुण्यातील केशवबाग येथून सुरू झाली. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यामध्ये सहभागी झाले असून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता रहिमतपूर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. पुणे येथून महाबळेश्वर, मेढा, सातारा मार्गे रहिमतपूर येथे आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री दत्त मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले.