गंगाखेड: सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
गंगाखेड शहरातील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी किराणा दुकानावर जाते असे सांगून गेली मात्र ती परत आली नाही. मुलीचा गुरुवार सकाळपासून शोध लागला नसल्यामुळे व परत न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी बस स्थानक रेल्वे स्टेशन तसेच नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही आढळून आल्याने मुलीच्या आईने गंगाखेड पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली