पुर्णा: चुडावा स्टेशनजवळ सचखंड एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यांतून अचानक निघाला धूर; प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
Purna, Parbhani | Oct 31, 2025 सचखंड एक्सप्रेस गाडी लिंबगाव-चुडावा दरम्यान आली असता बी-4 व बी-5 या डब्यांतून अचानक धूर निघू लागला. धूर वाढताना पाहून प्रवाशांनी त्वरित अलार्म चैन ओढून गाडी थांबवली. तात्काळ रेल्वे तांत्रिक कर्मचार्यांनी तपासणी केली असता ब्रेक लायनर अडकल्यामुळे निर्माण झालेल्या घर्षणातून धूर निघत असल्याचे स्पष्ट झाले. कर्मचार्यानी त्वरित उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी गाडीला सुमारे 20 मिनिटे चुडावा स्थानकावर थांबवण्यात आले, त्यानंतर ती पुन्हा सुरक्षितपणे अमृतसरच्या दिशेने रवाना झाली