वाशिम: पूरग्रस्त महाराष्ट्र – एक हात मदतीचा उपक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती कडून १लाखाच्या मदतीचा धनादेश
Washim, Washim | Oct 14, 2025 पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी शासनामार्फत “पूरग्रस्त महाराष्ट्र – एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सामाजिक व मानवतावादी उपक्रमाला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमांतर्गत आज दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीकरिता १,००,००० (एक लाख रुपये) इतक्या रकमेचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.