साक्री: अक्कलपाडा प्रकल्पातून ३२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग;खबरदारीचे आवाहन
Sakri, Dhule | Oct 30, 2025 साक्री तालुक्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा प्रवाह वाढत आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून ३२०० क्युसेक विसर्गाने पाणी सुरू होते.तसेच पाण्याचा येवा वाढल्यास पूर्वसूचनेने विसर्ग वाढविण्यात ये