दिवा परिसरामध्ये एक महिन्यापूर्वी एका पाच वर्षाच्या चिमूरडीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. तिच्यावर उपचार सुरू होते मात्र तिला रेबीजची लक्षणे आढळून आले. 3 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर तिची प्रकृती अत्यंत खालावली. ती स्वतःला चावा घेऊ लागली, ओरडा ओरड करू लागली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने योग्य ते उपचार केले नाहीत म्हणून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे