उत्तर सोलापूर: पुलावरून वाहून गेलेले रिक्षाचालक सतिष शिंदे अद्याप बेपत्ता; खासदार प्रणिती शिंदेंचे प्रशासनाला निर्देश: NDRF पथक दाखल...
सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे (वाहन क्र. एम एच - १३ सी टी ०६४१) हे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सायं 5 वाजता घटनास्थळी खा. प्रणिती शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या कुटुंबियांचीही भेट त्यांना धीर दिला.