शिरूर कासार: जिल्ह्यात 07 लाख 13 हजार हेक्टर वरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली, केंद्रीय पथकाने केंद्राला अहवाल पाठवला
जिल्ह्यातील ८ लाख ६ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ७लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून, आतापर्यंत ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे तर ४४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १ ,००० पेक्षा अधिक जनावरांचे प्राण गेले, १,३१३ घरांचे संपूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आणि ७,४७२ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे जिल्हा अहवालात नमूद आहे . सार्वजनिक मालमत्तांना देखील मोठी झळ बसली आहे. बांधकाम विभागाचे रस्ते आणि पुलांचे नुकसान