अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत जिल्हा शासकीय रुग्णालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला नव्या वर्षात सुरुवात होणार आहे स्थानिक पातळीवर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेचे वैद्यकीय शिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना दीर्घ काळाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे खासदार निलेश लंके यांनी यासाठी गेले दीड वर्ष पाठपुरावा केला होता