जळगाव जामोद: भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न, दुर्गा चौक येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात
आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मॅरेथॉन स्पर्धेला शहरातील दुर्गा चौक इथून सुरुवात झाली. सौ अपर्णा संजय कुटे व मुख्य अधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गट व महिला गट असे विभाजन करण्यात आले होते पुरुष गटात 107 पुरुषांनी व महिला गटात 40 महिलांनी सहभाग नोंदवला.