सातारा: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन गटात मारामारी, रुग्णालयात दगडफेक, नामदेववाडी झोपडपट्टीतील पूर्वीच्या वादातून घडला प्रकार
Satara, Satara | Sep 18, 2025 जुन्या वादातून नामदेववाडी झोपडपट्टी येथे बुधवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पुन्हा शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.