जळगाव शहरातील जुने बी.जे. मार्केट परिसरातील किराणा दुकान फोडून दुकानातून ५१ हजार रूपये किंमतीचे किराणा साहित्य चोरून नेल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.