नागपूर ग्रामीण: नागपूरच्या ४० पोलिसांना 'महासंचालक सन्मानचिन्ह' , महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आला सत्कार
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नागपूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर झाले.यामध्ये पोलीस उपायुक्त लोहित मतानी, निकेतन कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त विलास शेंडे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, प्रवीण काळे व शुभांगी देशमुख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.