नाशिक: जिल्ह्यात मत्स उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत :मंत्री नितेश राणे
Nashik, Nashik | Nov 6, 2025 नाशिक जिल्ह्यात तलावांची संख्या अधिक असून मत्स उत्पादनासाठी अधिक संधी आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन करून मत्स उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्याचे मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. गुरुवारी दि.६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, मत्सव्यवसाय विभाग नाशिकचे प्रादेशिक आयुक्त ना.वि.भादुले, आधीकरी उपस्थि होते.