जालना: अबकड वर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी 21 जुलैच्या भव्य मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे:अॅड.ब्रह्मानंद चव्हाण
Jalna, Jalna | Jul 1, 2026 राज्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील अबकड वर्गीकरणासंदर्भात सुरू असलेल्या हालचाली आणि शासनाकडून घेतल्या जाणार्या निर्णयांच्या विरोधात 21 जुलै 2026 रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव अॅड. ब्रम्हाणंद चव्हाण यांनी दिली. या मोर्चात समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. बुधवार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.