नायगाव-खैरगाव: पत्नीकडे वाईट नजरेने बघतोस का म्हणून एका 17 वर्षीय युवकाचा आरोपीने गडगा येथे केला खून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी सात ते आठच्या दरम्यान गडगा शिवारात ता. नायगाव जि. नांदेड येथे. यातील मयत जिशान लतीफ सय्यद, वय 17 वर्षे रा. डोंगरगाव ता. मुखेड जि. नांदेड यास यातील आरोपी आब्बास रमजान शेख, वय 24 वर्षे रा. डोगरगाव ता मुखेड याने पत्नीकडे वाईट उद्देशाने पाहत असल्याचे संशयावरून खुन केला. फिर्यादी लतीफ चंदूलाल सय्यद, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती रा. डोंगरगाव ता. मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन नायगाव पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अब्बास शेख विरुद्ध आज रोजी खुनाचा गुन्हा दाखल