वरोरा: शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळण्याबाबत शेतकरी नेते किशोर डुकरे यांचे वरोरा तहसीलदारांना निवेदन
वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी आज दि 4 नोव्हेंबर ला 12 वाजता तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी नमूद केले की, तालुक्यातील अनेक शेतकरी तसेच गैर-अर्जदार शेतकऱ्यांनी शेतीमधून जाणारे पाण्याचे नैसर्गिक मार्ग आणि शेतीचे रस्ते बेकायदेशीरपणे बंद केले आहेत.