जळगाव येथील नवीन बस स्थानकातील विभाग नियंत्रकातील वरिष्ठ लिपिकाने ३० हजार रुपयांची लाचीची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रमाणे जळगाव लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. या संदर्भात शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.