नागपूर शहर: जुन्या वादातून संताप! विनोबा भावे नगरात गॅरेज समोर उभ्या असलेल्या दुचाकींना पेटविले, घटनेचे सीसीटीव्ही वायरल
यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विनोबा भावे नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाच्या कारणावरून काही अज्ञात समाजकंटकांनी एका गॅरेजसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना पेट्रोल टाकून आग लावली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विनोबा भावे नगरमध्ये असलेल्या एका गॅरेजसमोर रात्रीच्या वेळी दुचाकी उभ्या होत्या.