शेतकरी बांधवांच्या संवाद दौऱ्यात आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अहमदपुर तालुक्यातील थोरलेवाडीला भेट दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आणि कर्जमुक्ती ह्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मिळवल्याशिवाय शांत बसायचं नाही, हा निर्धार ह्या संवाद दौऱ्यात प्रत्येकजण करत आहे. सरकारच्या दगाबाजीची पोलखोल शेतकरी स्वत: करत आहेत. ह्या दगाबाजीला आता उत्तर आम्ही एकजुटीने देणारच, हा विश्वास देखील ह्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.