भोकरदन: विरेगाव येथे भोकरदन जाफराबाद मुख्य रोडवर ऑटो रिक्षा व दुचाकी भीषण अपघात ,21 वर्षीय दुचाकी स्वार जागीच ठार
आज दिनांक 4 जून 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथे भोकरदन ते जाफराबाद मुख्य रोडवर काल दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी ऑटो रिक्षा व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन 21 वर्षीय दुचाकीस्वार शिवाजी राजू निर्मळ आजादीच ठार झाला आहे तर सागर रमेश निकाळजे ,भगवान प्रल्हाद गावंडे, जीवन प्रकाश खामट, प्रकाश विठ्ठल खामट हे गंभीर जखमी झाली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.