जिल्ह्यातील परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि 20 नोव्हेंबर ला 12 वाजता पार पडलेल्या या बैठकीला प्रभारी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदींसह उपस्थित होते.