माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला जिल्ह्यात मोठे बळ मिळाले आहे. दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान एका भव्य सोहळ्यात भंडारा जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात उत्साहाने प्रवेश केला. भंडारा जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी चरण वाघमारे यांच्या विकासकामांच्या धोरणावर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात येण्याचा निर्णय घेतला.