गोंदिया: विकसित भारत,जी-रामजी योजनेतून गावागावात रोजगार,आत्मनिर्भरताची होणार क्राती.. आमदार अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा तसेच विकसित भारत योजने अंतर्गत रोजगार हमीच्या कामावर काम केल्यावर आठ दिवसात वेतन मिळणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या योजनेमधील फरक उद्दिष्टे व अंमलबजावणी प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती कौशल्य विकास व स्वावलंबनाच्या दिशेने या योजनेचे महत्त्व आमदार विनोद अग्रवाल यांनी अधोरेखित केले.