बार्शीटाकळी: बार्शीटाकळी नगरपंचायतीत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि भाजप सोबत चुरशी लढत
अकोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायतीत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांनी जोरदारपणे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. प्रचाराला वेग येत असताना अनेक नागरिकांनी यावेळीही विकास करणारा नगराध्यक्ष सत्तेत निवडून देणार असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक पातळीवर विकासकामे, मूलभूत सुविधा आणि मागील कारभाराबद्दल समाधान व्यक्त करत नागरिक पुन्हा काँग्रेसच्या बाजूने कल झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.