दीपावली पाडव्याच्या शुभप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विक्रम अनिल राठोड यांनी आदरांजलीपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान सणासुदीच्या शुभेच्छा देतानाच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, येणाऱ्या निवडणुका तसेच स्व. आमदार अनिल राठोड यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.