वर्चस्वाच्या वादातून पार्टीमध्ये गॅंगमधील सदस्यांमध्ये वाद होवून गोळीबार झाला. या गोळीबारात आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर (वय २८, रा. कांचन नगर) याच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. तर गणेश उर्फ काल्या सोनवणे, सागर पाटील व तुषार उर्फ साबू सोनवणे हे तिघे जखमी झाले. याप्रकरणी सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, यापैकी दोघांची चौकशी करुन सोडून दिले. तर विक्की चौधरी याला अटक करण्यात आली.