जालना: छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीतर्फे
शालेय साहित्य वाटप व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Jalna, Jalna | May 12, 2026 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात येत असलेल्या 'शंभू सप्ताहा' अंतर्गत सोमवार, दि. ११ मे रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक आणि वनरक्षक यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. झेप करिअर अकॅडमीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेतील गटनेते महेश निकम, सुजित जोगस, राऊ युवा संघटनेचे संस्थापक श्रीपाद रत्नपारखी,विश्वं