दिग्रस: दिनबाई शाळेत मंत्री संजय राठोड यांच्या तर्फे बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वतीने मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील बारावी उत्तीर्ण बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे आयोजन आज दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता दिग्रसच्या दिनबाई शाळेत करण्यात आले. या परीक्षेसाठी शेकडो बंजारा समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते