माण: श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर येथे श्री.शंभू महादेवाचे घेतले दर्शन; विधिवत केली पूजाअर्चा
Man, Satara | Oct 16, 2025 सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता परंपरागत व ऐतिहासिक देवस्थान शिखर शिंगणापूर येथे श्री.शंभू महादेवाचे दर्शन घेतले. पवित्र वातावरणात अत्यंत भक्तिभावाने अभिषेक, पूजा व अर्चा करत त्यांनी महादेवाचे स्मरण केले. याप्रसंगी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी रयतेच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी मन:पूर्वक प्रार्थना केली.