अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 5 जानेवारीला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार,अजनी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहिता लागू असताना ही कारवाई करण्यात आली. आरोपीं विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.