पेण: जनावरांना गुंगीचे औषध देऊन त्यांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या टोळीचा पेण पोलिसांनी केला पर्दाफाश
Pen, Raigad | Nov 12, 2025 पेण तालुक्यात वरसई फाट्याजवळ जनावरांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करून त्यांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पेण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी शफिक रफिक अन्सारी, इम्रान मलंग पटेल, सलमान अब्दुल अहमद पटेल, सोनू जुबेर खान आणि बाजल राशीद शेख या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अजिज शेख हा आरोपी फरार असून, त्याचा शोध पेण पोलिसांकडून सुरू आहे.