जालना: पाटोदा साठवण तलावामुळे २३२ दलित कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
Jalna, Jalna | Jun 22, 2026 पाटोदा साठवण तलावामुळे २३२ दलित कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. आज दिनांक 22 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या २३२ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट ओढवले असून, या कुटुंबांना न्याय मिळावा व गावठाणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.