सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जिल्ह्यात 66 हजार 769 सुक्ष्म व 59 मध्यम असे नोंदणीकृत उद्योग आहेत. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. यासाठी उद्योजकांच्या समस्या व मदतीसाठी मैत्री कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मेत्री कक्षाचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील हजारे यांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास केले आहे.