कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे वरोरा येथील बस स्थानकावर आज दि 6 डिसेंबर ला 12 वाजता महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. सदर कार्यक्रम वरोरा आगाराचे व्यवस्थापक वर्धेकर यांच्या अध्यक्षतेखाली कास्ट ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र गोडसे यांच्या नियोजनात पार पडला. कार्यक्रमाला विशाखा चिकाटे , कार्यकर्ते बंडू लभाने, दशरथ शेंडे, टिपले, सोनारकर, विनायक मडावी, डॉ. मेश्राम बहुसंख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.