चोपडा: सुंदरगढी भागातील २५ वर्षीय तरुण झाला बेपत्ता, चोपडा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
Chopda, Jalgaon | Sep 21, 2025 चोपडा शहरात सुंदरगढी हा भाग आहे.या भागातील रहिवाशी नारायण रघुनाथ चौधरी वय २५ हा तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी सोहम स्टेशनरी येथे कामाला जात आहे. असे सांगून घरून गेलेला हा तरुण नंतर घरी परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.