अकोला शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील भीमनगर आणि शांतिनगर परिसरात आज सकाळी आलेल्या नळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ व छोटे जीवजंतू आढळून आले. हे पाणी पिण्यास तर दूरच, हात धुण्याच्या लायकीचेही नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सम्राट अशोक सेनेचे आकाश शिरसाट यांनी दिनांक 7 डिसेंबर रोजी सायंक