पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी 18 ऑक्टोबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पोलीस परिमंडळ क्रमांक एक नागपूर शहर तर्फे आज जप्त मुद्देमाल परतावा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त सिंगार रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 87 लाख रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.