नागपूर ग्रामीण: रेती वाहतूकदारांवरील कारवाईवरून शिवसेना (UBT) आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आश्वासन
अधिकृत रॉयल्टी भरूनही रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांवर 'प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट' अंतर्गत होत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि ट्रक युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपूर शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो ट्रान्सपोर्टर्सनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.