राळेगाव: सावंगी पेरका येथे दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर राळेगाव पोलिसांची कारवाई, ९ लाख ९१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून एका गाडीतून देशी दारूचा साठा राळेगाव पोलिसांनी जप्त केला या कारवाईत 9 लाख 91 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.ही कारवाई राळेगाव पोलिसांनी दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील सावंगी पेरका गावाजवळ केली.